अहिल्यानगर : हिंदू संस्कृतीत विवाहास अनन्य साधारण महत्व आहे. हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी पंधरावा संस्कार आहे. ज्यामुळे विवाहाची इच्छा असणारे उपवर स्त्री आणि पुरुष ब्राह्मण, नातेवाईक आणि अग्नी यांचा साक्षीने पती पत्नी म्हणून संबद्ध होतात त्या संस्काराला विवाह असे म्हणतात. मात्र सध्या काहीजण हे सर्व केवळ देखावा करत असल्याचे दिसत आहे.
कारण एकीकडे पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी वटपौणिमेला महिला प्रार्थना करतात तर दुसरीकडे आपल्याच पतीची हत्या करण्यासाठी त्याच्यावर जेवणातून विष देत त्याच्यावर जादूटोणा केल्याचा प्रकार घडला आहे.

पती-पत्नीचे नाते हे प्रेम, विश्वास, आदर आणि वचनबद्धतेवर आधारित एक खास आणि महत्त्वाचे नाते आहे, जे दोन्ही व्यक्तींना आनंद, साथ आणि आधार देते. आपल्या भारतीय संस्कृतीत तर पती-पत्नीचे नाते अधिक पवित्र मानले जाते.
मात्र अलीकडच्या काळात शिकलेल्या मुली या सर्व गोष्टी मनात नाहीत. नुकतीच उपजिल्हाधिकारी असलेल्या पतीला पतीनेच तिच्या आई, भाऊ , मोलकरीण आणि मित्राच्या मदतीने जीवे मारण्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, देवेंद्र कटके हे छत्रपती संभाजीनगरमध्ये निवडणूक उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहेत. मात्र देवेंद्र कटके यांना त्यांच्या पत्नीनेच मित्राच्या मदतीने जीवनातून संपविण्याचा डाव आखल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याकामी पत्नीने आई, भाऊ, मित्र आणि घरातील मोलकरीण यांच्यासोबत कट रचून अन्नातून विषप्रयोग केल्याचे समोर आले आहे. तसेच या सर्वांनी कट रचून देवेंद्र कटके यांच्यावर अघोरी विद्येचे प्रयोग केले. त्यांना जेवणातून विषबाधा करून मारण्याचा कट रचला. घरात देवेंद्र यांच्या गादीखाली काळे झालेले लिंबू, सुई टोचलेली बाहुली आढळली.
फुलदाणीत बिबे, स्मशानातील राख, कोळसा, लवंगांची माळ, शेंदूर असे साहित्य दिसून आले. याप्रकरणी पत्नीच्या मित्रासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील तिघांना अटक करण्यात आली आहे. चक्क उपजिल्हाधिकारी असलेल्या पतीच्याच जीवावर पत्नीच उठल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.