अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांना उध्वस्त केले. काळे कायदे करून देश उद्योगपतींच्या घशात घालण्याचे षडयंत्र देशात सुरू आहे.
बाजार समित्यांना धोक्यात आणत शेतकऱ्यांची विक्री व्यवस्था मोडून काढण्याचे काम केले जात आहे, अशी टीका काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यव्यापी वर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीमध्ये केली.
अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेसच्या लालटकी कार्यालयामधून या डिजिटल रॅलीमध्ये शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झाले होते.
यावेळी ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, अनंतराव गारदे, रियाज शेख, सय्यद खलील, शंकर आव्हाड, अमित भांड, विशाल कळमकर, प्रमोद अबुज,
अनिस चुडीवाला, प्रा.डॉ.बापू चंदनशिवे, चिरंजीव गाढवे, रॉबिन साळवे, संजय भिंगारदिवे, योगेश काळे, इंटक काँग्रेसचे हनीफभाई शेख, Adv. सुरेश सोरटे, Adv. चेतन रोहोकले, Adv.
अनिल घाडगे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी यात सहभागी झाले होते. शहर जिल्हा काँग्रेसचे मुबीन शेख, अन्वर सय्यद, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख,
महिला काँग्रेसच्या नलिनीताई गायकवाड, विद्यार्थी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दानिश शेख, क्रीडा विभागाचे प्रवीणदादा गीते, स्वप्नील पाठक आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी नगर शहराच्या विविध प्रभागांमधून या डिजिटल रॅलीमध्ये ऑनलाईन सहभागी झाले होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved