मोहटादेवी गडावर अष्टमीचा होम पेटवून नवरात्रोत्सवाची झाली सांगता

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :-  ‘दसरा’ हा हिंदू धर्मामधील महत्वाच्या सणांपैकी एक आहे. आश्विन शुद्ध दशमी दिवशी हा उत्सव साजरा होतो. आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेला देवीचे घट बसून नवरात्राला सुरुवात होते त्यानंतर दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी करण्यात येते.

याच अनुषंगाने पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवी गडावर मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत अष्टमीचा होम पेटवून नवरात्रोत्सवाची सांगता झाली.

होम हवनासाठी मोहटा देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर, आरती कुर्तडीकर, पाथर्डीचे दिवाणी न्यायाधीश सुशिल देशमुख, अहमदनगरच्या उपवनसंरक्षक अधिकारी सुवर्णा माने, विश्वस्त ॲड. सुभाष काकडे,मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे उपस्थित होते.

जिल्हा न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा व मालती यर्लागड्डा यांच्या हस्ते होमहवन विधी झाला. तसेच कुमारिका पूजन, सुवासिनी पूजन, ओटी भरणे आदी विधी होमहवनाच्या वेळी देवीचा स्वयंभू तांदळ्यावर गंगाजलाने अभिषेक केला.

अष्टमीचा होम झाल्यानंतर दरवर्षी मोहटा देवी गडावर यात्रा, कलाकारांच्या हजेऱ्या, कुस्त्यांचा फड असे अनेक कार्यक्रम होतात.

मात्र, करोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी इतर कार्यक्रमावर बंदी घातल्याने व गडावर १४४ कलम लागू केल्याने हे कार्यक्रम आता होणार नसल्याचे भणगे यांनी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News