अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. ढगाळ वातावरण तसेच कडाक्याच्या थंडीमुळे पशु प्राण्यांचा मृत्यू होत असल्याच्या घटना नगर जिल्ह्यात घडल्या आहेत.
यामध्ये जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे 864 शेळ्या आणि मेंढ्या मृत पावलेल्या आहेत. यामुळे पशूपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे.
नगरसह राज्यात 1 डिसेंबरपासून गारठा आणि संततधार आवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे नगर जिल्ह्यातील पारनेर, संगमेनर, नगर, श्रीगोंदा, अकोले आणि कर्जत तालुक्यात 864 शेळ्या आणि मेंढ्या मृत पावल्या आहेत.
दरम्यान राहुरी तालुक्यात शनिवारी आणखी 8 मेंढ्या दगावाल्या असून एकूण मृतांची संख्या आता 872 झाली आहे. मात्र राज्य सरकारकडून देण्यात येणार्या नुकसान भरपाईच्या नियमात थंडीच्या लाटेचा समावेश नसल्याने राज्य सरकारने नियमात बदल केल्यास नुकसानग्रस्त पशूपालकांना मदत करता येणे शक्य होणार आहे.
यामुळे पशूसंवर्धन विभागामार्फत नुकसानग्रस्त शेतकर्यांना थेट मदत देता येणे शक्य नसल्याचे पशूसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले असून आता राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे पशूपालकांचे लक्ष लागले आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम