महाकृषी ऊर्जा अभियानाच्या माध्यमातून दीड लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी वीजविले भरली

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑक्टोबर 2021 :-  कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत सुमारे 66 टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाच्या महाकृषी ऊर्जा अभियानाच्या माध्यमातून उपलब्ध आहे.

नुकतेच या योजनेचा लाभ घेत यामध्ये नगर जिल्ह्यात एक लाख 50 हजार 198 शेतकर्‍यांनी 105 कोटी 50 लाख रूपये वीजबिले भरले आहे.

तर नाशिक परिमंडलात दोन लाख 76 हजार 634 शेतकर्‍यांनी वीजबिल भरले आहे. कृषिपंपांच्या वीजबिलांतून संपूर्ण थकबाकीमुक्ती व सोबतच भरलेल्या वीजबिलांच्या 66 टक्के निधीतून गावातील वीजयंत्रणेचा विकास या दुहेरी फायद्यासाठी शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

दरम्यान या योजनेत वीजबिलांच्या वसुलीतून एकूण 66 टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी 33 टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे.

हा निधी संबधीत ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे.

निधीतून होणार विकासात्मक कामे निधीतून नवीन उपकेंद्र, नवीन रोहित्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण

व उपकेंद्रातील विविध यंत्रणेच्या पायाभूत सक्षमीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!