Ahmednagar News : हे घर माझे आहे, या घरात तूम्ही रहायचे नाहीत, असे म्हणून भावाने भावाला तसेच आई व भावजयला लाकडी दांडा, लोखंडी पाईप व लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दि. २७ मार्च २०२४ रोजी रात्रीच्या दरम्यान घडली.
प्रियंका विशाल गोडगे वय २२ वर्षे रा. लाख रोड, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, यांनी राहुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, प्रियंका गोडगे यांचा भाया गौरव ज्ञानदेव गोडगे हा त्यांच्या घराचे शेजारीच रहावयास आहे.
दि. २७ मार्च २०२४ रोजी रात्री १०.३० वा. चे सुमारास प्रियंका गोडगे व त्यांची सासू शोभा या दोघी घरात असताना येथे त्यांचा भाया गौरव ज्ञानदेव गोडगे व त्याचा मेव्हणा राहुल दिलीप भोसले हे दोघे दारु पिऊन आले व म्हणाले की, हे घर आमचे आहे.
तुम्ही येथे रहायचे नाही, असे म्हणुन शिवीगाळ करु लागले. त्यावेळी प्रियंका गोडगे त्यांना म्हणाल्या की, तुम्ही शिवीगाळ करु नका, असे म्हणाल्याचा त्यांना राग आल्याने त्यांनी प्रियंका गोडगे, त्यांची सासू शोभा व पती विशाल यांना लाकडी दांडा, लोखंडी पाईप व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच धमकी दिली.
या मारहाणीत प्रियंका गोडगे यांच्या गळ्यातील पोत तुटुन गहाळ झाली आहे. घटनेनंतर प्रियंका विशाल गोडगे यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून आरोपी गौरव ज्ञानदेव गोडगे,
रविना गौरव गोडगे रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी व राहुल दिलीप भोसले, रा. निर्मळ पिंपरी ता. राहाता या तिघांवर गुन्हा रजि. नं. ३४४/२०२४ भादंवि कलम ३२३, ३२४, ३४, ४२७, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.