Ahmednagar News : दाजीनेच मेव्हण्यावर केला कोयत्याने वार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधून अनेक गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. आता आणखी एका घटनेने खळबळ उडाली आहे. दाजीनेच मेव्हण्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी (दि. 5) पहाटे नगर-मनमाड रस्त्यावरील मेघनंद हॉटेल समोर कोयत्याने हल्ला केल्याची ही घटना घडली आहे.

अमित राजू करमाकर (वय 26 रा. गौतमनगर, बालिकाश्रम रस्ता) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात दाजी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमोल दशरथ शिंदे (रा. कॉटेज कॉर्नर, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या दाजीचे नाव आहे. अमित व त्यांचे दाजी अमोल यांच्यात अधून-मधून किरकोळ वाद होत असतात. शुक्रवारी अमित व त्यांची पत्नी प्रतिभा असे दोघे बोल्हेगाव येथे चालले होते.

त्याचवेळेला ते जात असतानाच मेघनंद हॉटेल समोर बस स्टॉप शेजारी त्यांना अमोल याने थांबविले. त्याने विनाकारण शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरूवात केली व तावडीत सापडला असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

अमित यांनी काय झाले अशी विचारणा केली असता त्याने लोखंडी कोयत्याने डाव्या हातावर मारून जखमी केले. भांडण सोडविण्याठी मध्ये आलेल्या अमितची पत्नी प्रतिभा यांना देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ‘तू माझे नादी लागला तर तुला जिवे ठार मारीन’,

अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाद झाल्यानंतर अमित यांनी तोफखाना पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe