अहमदनगर Live24 टीम, 29 ऑक्टोबर 2021 :- राज्यात एकीकडे कोरोनाबाधितांची आकडेवारी घटात असताना मात्र दुसरीकडे नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायमच होता.
यामुळे प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढली होती. यातच प्रशासनाने केलेल्या कठोर उपाय योजनांमुळे जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
नुकतेच राहाता तालुक्यात 11 करोनाबाधित रुग्ण आढळूून आले असून 27 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 137 अॅक्टीव्ह करोना रुग्ण उपचार घेत आहेत.
विशेषबाब म्हणजे गेल्या 24 तासात राहाता व शिर्डी शहरात एकही रुग्ण आढळून आले नाही. त्यामुळे दोन्ही शहरे ही करोनामुक्त झाली आहेत.
राहाता तालुक्यात आतापर्यंत 24998 करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 24860 रुग्ण बरे होऊन घरी गेले.
जिल्हा रुग्णालयात-01 खासगी रुग्णालयात 07 तर अँटीजेन चाचणीत 03 असे एकूण 11 नवीन रुग्ण आढळून आले आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम