खासदार सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले ! म्हणाले आमच्या साखर वाटपामुळे ‘त्यांची’ साखर…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : गोरगरीब जनतेला साखर वाटपाचा हेतू स्वच्छ आहे. ( दि. २२ ) जानेवारी रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे मंदिर उभारले जाणार असून, त्या कार्यक्रमांमध्ये संपूर्ण जगाचा सहभाग राहणार असून,

या साखर आणि डाळीच्या माध्यमातून महिला भगिनींनी २२ जानेवारीला दिवाळी साजरी करायची आहे, त्यावेळी या साखर आणि डाळीपासून बनवलेले लाडू आपण अयोध्येला प्रसाद म्हणून घेऊन जाणार आहोत.

सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे या साखर वाटपाचा कोणीही राजकीय अर्थ लावू नये. मात्र, आमच्या साखर वाटपामुळे जे इतरांना कधी चहा पाजू शकत नाहीत, अशा विरोधकांची मात्र साखर वाढली असल्याची टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी केली आहे.

करंजी, ता. पाथर्डी येथे ग्रामपंचायत तसेच खा. विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या सुमारे साडेचार कोटी रुपये खर्चाचे सभामंडप, रस्ते व बचत गटांना धनादेशाचे वाटप, अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडले.

या वेळी खा. विखे बोलत होते. या वेळी कर्डिले म्हणाले, मागील तीन वर्षात जिल्ह्यात रखडलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्याचे काम दीड वर्षात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रामाणिकपणे केले असून, वांबोरी चारी टप्पा दोनचा प्रश्न आम्ही कौटुबिक जबाबदारी म्हणून लवकरच टेंडर काढून मार्गी लावला जाणार आहे.

त्याचबरोबर वांबोरी चारी व मिरी तिसगाव योजना लवकरच सौरऊर्जेवर चालवण्याचे नियोजन असून, या दोन्ही योजना या सौरउर्जेवर सुरू झाल्यानंतर कोणालाही पाणीपट्टी भरण्याची गरज भासणार नसल्याचे कर्डिले म्हणाले,

दि.२२ जानेवारीला श्रीक्षेत्र आयोध्या येथे प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून, हा दिवस आपण सर्वांनी दिवाळी म्हणून साजरा करावा, आज दिलेल्या साखर आणि डाळीतून लाडू तयार करून ते एकमेकांना वाटप करावेत.

निश्चितच हा क्षण आपल्या सर्वांच्या आयुष्याचा आशेचा किरण ठरणारा असून, श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेसाठी जगातून लोक या ठिकाणी उपस्थित राहणार असल्याचे खा. विखे पाटील या वेळी म्हणाले,

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड, माजी सभापती मिर्झा मणियार, माजी जि.प. सदस्य पुरुषोत्तम आठरे, मिरी तिसगाव नळयोजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर, माकेंट कमिटी संचालक अजय रक्ताटे, वैभव खलाटे,

अरुण रायकर, जिजाबापू लोंढे, सरपंच चारुदत्त वाघ, चेअरमन बंडू पाठक, माजी सरपंच संतोष शिंदे, सुरेश चव्हाण, संभाजी वाघ, डॉ. नंदकिशोर नरसाळे, राजेंद्र दगडखैर, रावसाहेब बांहेकर,

पृथ्वीराज आठरे, नगरसेवक महेश बोरुडे, माजी सरपंच सुनील साखरे, चेअरमन आसाराम अकोलकर, उपसरपंच नवनाथ आरोळे, राहूल अकोलकर, विवेक मोरे, उत्तम अकोलकर, गजानन गायककड,

महिला बचत गटाच्या सिंधुबाई आहेर, सुनिता क्षेत्रे, मनीषा गाडेकर, मनीषा क्षेत्रे, सोनाली अकोलकर यांच्यासह महिला भगिनी उपस्थित होत्या.

या वेळी उपस्थितांना खा. विखे यांच्याकडून साखर वाटप करण्यात आली. प्रास्ताविक माजी सरपंच सुनील साखरे यांनी केले. सूत्रसंचालन अँड. नितीन अकोलकर यांनी केले. आभार माजी चेअरमन उत्तम अकोलकर यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe