नगर जवळील दरेवाडी परिसरात असलेल्या हरीमळा या मोठ्या लोकवस्तीतील नागरिकांच्या दळण-वळणासाठी असलेला नगरवाला रोड या नावाचा रस्ता लष्कराने तेथे गेट लावून बंद केल्याने हरीमळा येथील रहिवासी नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
या रस्ता खुला होण्यासाठी प्रयत्त करावेत अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे खा. सुजय विखे यांच्याकडे केली आहे.दरेवाडीच्या हरीमळा परिसरात मोठी लोकवस्ती आहे.
३०० ते ४०० माजी सैनिक तसेच ३०० च्या आसपास आजी सैनिकांचे कुटुंबीय तसेच लष्करी भागात काम करणारे अनेक कर्मचारी तेथे वास्तव्यास आहेत. या नागरिकांना लष्करी हद्दीत जाण्यासाठी नगरवाला रोड या नावाचा रस्ता सोयीचा आहे.
मात्र लष्कराने गेल्या काही दिवसांपासून हा रस्ता गेट लावून रहदारी साठी बंद केला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
या संदर्भात दरेवाडीचे माजी सरपंच अनिल करांडे यांनी संजय निमसे, बॉबी सिंग, हवालदार कोंडे, आत्माराम दहातोंडे, कॅप्टन नजीर अहमद, सुभेदार कुलकर्णी, ए.एन. खान, गोपाल जाधव, दत्तात्रय काळे, सुनिल जपे, भोपाल सिंग व अन्य नागरिकांच्या समवेत खा. सुजय विखे यांची भेट घेवून त्यांना समस्या सांगितल्या. तसेच लष्कराच्या अधिकाऱ्यांशी बोलून हा रस्ता खुला करून देण्याची मागणी केली.