खासदार सुजय विखेंनी आधी स्वतःचाच मेंदू तपासून घ्यावा !

Ahmednagar News

Ahmednagar News : खासदारकीच्या निवडणुकीत ज्यांच्या विरोधात दोन हात केले, त्यांच्याच हातात हात घालून तुम्ही फिरत आहात, ही जनतेची फसवणूक नाही का, असा सवाल करत विरोधकांचे मेंदू तपासण्याची भाषा करण्याआधी

तुमचा मेंदू तपासून घ्या, असा उपरोधिक सल्ला युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना दिला.

आमचा विरोध हा तुमच्या राजकीय स्वार्थी वृत्तीला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. एमआरआय प्रकल्पाचे लोकार्पण करताना खा. विखे यांनी विरोधकांवर टीका करत त्यांचे मेंदू तपासून घ्यावे, असा सल्ला दिला होता.

त्याला विक्रम राठोड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नको असलेले प्रकल्प तुम्ही नगरकरांच्या माथी मारत आहात. विविध उपक्रमांच्या नावाखाली मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मनपाच्या जागांवर ताबा मारण्याचा सपाटा तुम्ही लावलाय.

तुमच्या या वृत्तीला शिवसेनेने विरोध दर्शविला. नगरला आयुष रुग्णालय दिले. मात्र, प्रत्यक्षात जिल्ह्याला राज्य सरकारने देऊ केलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपण कोणत्या अधिकारात नाकारले.

विळद घाटातल्या आपल्या मेडिकल कॉलेजच्या व्यवसायावर परिणाम होऊ नये, म्हणून महाविद्यालय नाकारले का? असा सवाल राठोड यांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe