अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Ahmednagar Politics :- जिल्हा परिषदेमध्ये टक्केवारी शिवाय कामे मंजूर होत नाही. टक्केवारी मिळवण्यासाठी सत्तेचा वापर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे.
गोर गरिबांच्या कामासाठी सत्तेचा वापर आपण करतो कोणाच्या ताटातील अन्न खाण्यासाठी राजकारण करत नाही असा घणाघात महविकास आघाडीच्या नेत्यांवर खासदार डॉ सुजय विखे यांनी केला.

शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील लाभार्थ्यांना राष्ट्रीय वयोश्री योजनेचे मोफत साहित्य साधने वितरण प्रसंगी खासदार डॉ सुजय विखे बोलत होते. पुढे विखे म्हणाले,लोकांच्या कामांसाठी स्वतःच्या खर्चातून कामे वेळप्रसंगी मार्गी आमच्याकडून लावले जाते.
मात्र आघाडीचे नेते लोकांच्या विकास कामातील टक्केवारीची रक्कम दिवसंदिवस वाढत आहे. असे काम या नेत्यांचे आहे. शेवगाव -पाथर्डी तालुक्यात काय विकास होणार असा सवाल विखे यांनी उपस्थित केला.
एका ठिकाणी सत्ता देऊन त्यांचे परिणाम काय होतात त्यांचे जिल्हा परिषेदेत अनुभवयाला येत आहे.गरिबांचे मुले शिकतात अश्या जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांच्या बांधकामात सुद्धा टक्केवारी घेण्यात येते हि टक्केवारीची प्रथा आणि संस्कृती पहिले कधीच जिल्हात नव्हती.
आम्हाला सत्ता हवी आहे ती फक्त लोंकाच्या प्रामाणिक कामासाठी. अनेक लोक माझ्यावर आरोप करून शिंतोडे उडवतात मला याचा काही फरक पडत नाही.
मी प्रामाणिक काम करतो कोणाच्या ताटातील घेत नाही. त्यामुळे मला कोणाची भीती नाही.असे हि विखे म्हणले.