अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- शहर पाणी पुरवठा योजनेवरील थकबाकी १५ दिवसांत भरावी, अन्यथा वीजपुरवठा खंडित केला जाईल, अशी नोटिस महावितरणने मनपाला बजावली आहे.
नोटिस मिळताच मनपात लेखाधिकारी, पाणीपुरवठा विभागासह आयुक्तही सतर्क झाले आहेत. तातडीने थकबाकी न भरल्यास पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची धास्ती आहे.
नगर शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी योजना ५० वर्षांपूर्वीची आहे. शहर उंचावर असल्याने मुळा धरणातील पाणी विळद येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणले जाते.
तेथून हे पाणी विद्युत मोटारीच्या सहाय्याने उपसा करून वसंत टेकडी येथील जलकुंभात आणले जाते. सुमाररे ३६ किलोमिटर अंतरावरून हे पाणी आणण्यासाठी मनपाला मोठा खर्च करावा.
या योजनेंतर्गत दरमहा मनपाला सुमारे दोन कोटी वीजबिलावर खर्च करावे लागतात. महावितरणने बजावलेल्या नोटिसेनुसार सुमारे ११ कोटी ९५ लाख ३९ हजार रूपयांचे बिल अदा करावे असे कळवले आहे. १५ दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम