Mula Dam ; मुळा धरणातून पाणी सोडले !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :- मुळा धरणाच्या २ ते १० क्रमांकाच्या नऊ मोऱ्यातून सोमवारी सकाळी १ हजार ८५ क्युसेकने मुळा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.

धरणातून मुळा नदीपात्रात पाणी सोडण्याची गेल्या पंधरवाड्यातील तिसरी वेळ आहे. सोमवारी सकाळी धरणाचा पाणीसाठा २५ हजार ८८६ दशलक्ष घनफूटावर स्थीर ठेवून पाणी सोडण्यात आले.

मुळा डाव्या कालव्यातून १८० क्युसेकने पाणी आवर्तन सुरू आहे. उजव्या कालव्याच्या आवर्तनासाठी सोमवार सकाळपर्यंत मुळा धरणातुन २९६.१९ दशलक्ष घनफूट तर मुळा डावा कालव्यातुन ६८.५१ दशलक्ष घनफूट पाणी खर्च झाले. सोमवारी सायंकाळी ६ वाजता मुळा धरणाच्या पाणीसाठ्याची २५ हजार ८८६ दशलक्ष घनफूट नोंद झाली होती.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe