मुळा धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर, राहुरी, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण !

Ahmednagarlive24 office
Published:

अखेर मुळा धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोहचल्याने राहुरी, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. सायंकाळी ६ वाजता कोतूळ येथील पाण्याची आवक मंदावली असली तरी मुळा धरणात १२ हजार ९८० दशलक्ष घनफुट झाला असून धरण ५० टक्के झाले आहे.

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी रात्री झालेल्या प्रचंड प्रमाणात तुफानी पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढला. या हंगामात प्रथमच सकाळी ९ वाजता २९ हजार ५३० क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू होती. तीच आवक १० वाजता २० हजार ८२८ क्यूसेकवर आली.

काल गुरुवारी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आवक सकाळी १० वाजता २० हजार ८२८ क्युसेक्सपर्यंत कमी झाली होती. दुपारी १ वाजता १५ हजार क्यूसेक्स तर ४ वाजता १३ हजार क्यूसेक्सवर आली. पावसाळी वातावरण पाहता आवक कमी जास्त होत आहेत.

२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा १३ हजार दशलक्ष घनफूट झाला होता. धरण ५० टक्के भरले. पावसाळ्यातील पुढील नक्षत्रात तुफानी पर्जन्यवृष्टी झाली तर धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरून व ओसांडून वाहील.

धरणात प्रामुख्याने अकोले तालुक्यातील कोतुळ व परिसरातुन पाणी येते व त्याखालील धरणाच्या कार्यक्षेत्रातील झालेला पावसाचे पाणीही धरणात जमा होते. सध्या पावसाची कामगिरी पाहता शेतकरी वर्गासह लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe