१ फेब्रुवारी २०२५ : अहिल्यानगर : संत भगवान बाबांचा आशिर्वाद आणि गडाचे मंहत डॉ.नामदेवशास्त्री यांचा पाठींबा हा मला भविष्यातील सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहेत. गेल्या ५३ दिवसात मला मुद्दामहुन टार्गेट केले जातेय.सरपंचाचा खुन करणाऱ्यांना फाशी द्या मात्र मला व माझ्या जातीला लक्ष करु नका. भगवान गडाची शक्ती माझ्या सोबत असली की मला चिंता कऱण्याचे कारण नाही.संकट काळात गड माझ्या पाठीशी उभा रहीला मला प्रेरणा मिळाली असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंढे यांनी व्यक्त केला.
संत भगवान गडावर धनंजय मुंढे गुरुवारी रात्री मु्क्कामी आले होते. सकाळी त्यांनी माध्यामांच्या प्रतिनिधींशी सवांद साधला.गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मुंडे यांचे भगवानगडावर सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत आगमन झाले. प्रचंड तणाव ,सलाईन घेतलेल्या हातावर पट्ट्या, निराश चेहरा घेऊन आलेले मुंडे यांनी महंतांना बघितल्यावर निशब्द पणे भावना व्यक्त केल्या. रात्री व सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांनी भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेत महापूजा केली.
सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महंत डॉ. नामदेव शास्त्री म्हणाले, आमची राजकीय सामाजिक व धार्मिक विषयावर चर्चा झाली. त्याच्या मानसिकतेचा आढावा घेत प्रचंड तणाव जाणवला. जो राजकीय घराण्यात जन्माला आला, अनेक पक्षाचे नेते त्याचे बालमित्र आहेत. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार ठरवलं जातंय. तो गोपीनाथ रावांचा पुतण्या आहे.खंडणीवर जगणारा नाही. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवले जातेय .
७०० वर्षांपासून जातिवाद नष्ट करण्याचे काम संत ज्ञानेश्वर आदी संतापासून सुरू आहे. जातीवाद, राजकीय स्वार्थासाठी नेत्यांनी उफाळून आणला आहे. भगवानगड भक्कमपणे त्याच्या पाठीशी उभा आहे. ज्या लोकांची हत्या झाली त्याची मानसिकता बिघडवण्याचे मागचे कारण मीडियाने शोधायला हवे. अगोदर झालेली मारहाण सुद्धा दखल घेण्याजोगी होती. त्याच्यावर गेल्या ५३ दिवसांपासून मीडिया ट्रोलींग सुरू आहे.
त्याचे वर निराळे आक्षेप घेताय. राजकीय स्वार्थक्षणिक असतो. त्यासाठी जाती-जातीत भांडणे लावणे, सर्वच नेत्यांच्या एक दिवशी अंगलट आल्यासारखे होईल. कायमस्वरूपी सलोखा बिघडवणाऱ्या पापी माणसाला कधीही समाधान नसते. पक्षाच्या नेत्यांना सुद्धा जाणीव आहे. खरा प्रकार काय आहे, हा विषय किती ताणायचा. हा त्यांचा विषय. आमच्या क्षेत्रात एवढा त्रास झाला असता तर तो राष्ट्रीय संत झाला असता.
अशी त्याच्यावर एकदाच पाळी आलेली नाही. एकदा घर फुटले. धनंजयने भरपूर सोसले. उंच उडत असताना आज त्याची मानसिक अवस्था बघा. एखाद्या माणसाने किती सहन करावे. समाजाच्या भावना आमच्यापर्यंतही व्यक्त होतात. भविष्यात याचेही परिणाम वाईट होऊ शकतात. प्रत्येक पक्षाच्या नेत्याने दखल घेण्यासारखे आहे. मीडियाने जातिवाद संपवण्यासाठी प्रयत्न करावेत. विकृत नेतृत्व समाजाला कधीही खड्ड्यात नेणारे असते…”
त्यानंतर मुंडे यांनी महंतांच्या जनसंपर्क दालनात पत्रकार परिषद घेतली.ते म्हणाले ,अनेक वर्षानंतर येथे आलो. मंत्रीपदानंतर आजच आलो.सामान्य कार्यकर्त्यांमागे भगवानगड उभा आहे यासारखी दुसरी शक्ती नाही. न्यायाचार्याच्या एवढ्या विधानाने सुद्धा मोठी ताकद व जबाबदारी वाढली. ऐश्वर्या संपन्न गड संकट काळात पाठीशी उभा राहिला. जातीपाती पलीकडे जाऊन आपण सेवा केली. गेल्या ५३ दिवसांपासून संकट सुरू आहे. मीडिया मधून मला ट्रोल केलं जातंय.