महापालिकेच्या घंटा गाड्या समस्यांनी ग्रासल्या…

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- गाडीवाला आया घरसे कचरा निकाल … हे गाणं ऐकताच घंटा गाडी कचरा संकलनासाठी आली याची आपल्याला समजते. कचरा साफ करत शहराला रोगराईमुक्त ठेवणाऱ्या मनपाच्या घंटा गाड्या सध्या समस्यांनी ग्रासल्या आहेत.

महापालिकेच्या घनकचरा विभागाने सात महिन्यांपूर्वी 64 नवीन घंटागाड्यांची खरेदी केली. यातील 22 वाहनांत डंपिंग ऍडजेस्टमेंटची समस्या निर्माण झाली आहे.

घनकचरा व्यवस्थानासाठीच्या ठेकेदाराने या घंटागाड्या महापालिकेल्या परत दिल्या आहेत. मनपाच्या 64 घंटागाड्यापैकी 2 नवीन घंटागाड्या कोंडवाडा विभागाला देण्यात आलेल्या आहेत.

62 वाहने घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी ठेकेदार संस्थेला भाडेतत्त्वावर देण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाचा ठेका स्वयंभू ट्रान्सपोर्टकडे आहे.

महापालिकेने “स्वयंभू’ला दिलेल्या 62 घंटागाड्यांपैकी 22 घंटागाड्यांच्या डंपिंग ऍडजेस्टमेंटमध्ये समस्या आल्या आहेत. या समस्येमुळे घंटागाड्या उलटण्याचीही शक्‍यता आहे.

ही 22 वाहने तातडीने दुरूस्त करावीत या मागणीची चार पत्रे ठेकेदार संस्थेने महापालिकेला दिली आहेत. मात्र वाहने दुरूस्त होत नसल्याने ही 22 वाहने ठेकेदार संस्थेने महापालिकेला परत केली आहेत.

त्या जागी शहरातील कचरा उचलण्यासाठी स्वतःची वाहने वापरात आणण्यास सुरवात केली आहे. या संदर्भात महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेत नुकतीच बैठक घेतली.

या बैठकीत वाहन खरेदी व वाहनांच्या बिघाडा संदर्भातील सर्व कागदपत्रे आठवड्या भरात सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment