अहमदनगर Live24 टीम, 03 नोव्हेंबर 2021 :- कोरोनाकाळात रुग्णाचा जीव वाचविणारे डॉक्टर देवदूतच ठरले. मात्र दुसरीकडे या व्यवसायाचा काही लोकांकडून काळा धंदा केला जात असल्याचे उघड झाले आहे.
नुकतेच समजलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 28 बोगस डॉक्टर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या हाती आली असून यातील संगमनेरच्या एका मुन्नाभाईवर कारवाई करण्यात आलेली आहे. तर महिना अखेरपर्यंत सर्व मुन्नाभाईंचां शोेध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
बोगस वैद्यकीय व्यवसायिक शोध समितीची बैठक नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक यांचे प्रतिनिधी म्हणून डॉ. दर्शना धोंडे, मनपा आरोग्य अधिकारी राजुरकर,
सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. सुनील पोटे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. दादासाहेब सांळुके आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यातील बोगस डॉक्टर शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सुचना केल्या. जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाची पदवी नसतानाही आरोग्य सेवा देणारे बोगस डॉक्टर आता जिल्हा परिषदेच्या रडारवर आहेत.
जिल्ह्यात 28 बोगस डॉक्टर असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली असून यात नगर, संगमनेर आणि शेवगाव प्रत्येकी 1, अकोले 4, पारनेर आणि श्रीगोंदा प्रत्येकी 8, पाथर्डी 5 यांचा समावेश आहे. त्यापैकी एकावर करवाई करण्यात आलेली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम