मुर्दाबाद.. मुर्दाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद… घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा शिवसेना ठाकरे पक्षाने जाळला ;

जम्मू कश्मीरच्या पहेलगाम मध्ये निष्पाप भारतीय हिंदू पर्यटकांवर भ्याड हल्ला करत मृत्यू तांडव घडवून आणणाऱ्या अतिरेक्यांचे, पाकिस्तानच्या झेंड्याचे पोस्टर्स अहिल्यानगर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र निदर्शने करत जाळण्यात आले.

मुर्दाबाद.. मुर्दाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद… अशी जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी दिल्ली गेट परिसर दणाणून सोडला. हा हल्ला पाकिस्तानचच षडयंत्र आहे. केंद्र सरकारने करारा जवाब देत पाकड्यांची मस्ती जिरवावी, अशी मागणी शहरप्रमुख किरण काळे यांनी केली आहे. मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मृत्युमुखींना श्रद्धांजली वाहत पुष्पचक्र अर्पण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पादत्राणे काढली नव्हती. या प्रकाराचा देखील शिवसेनेने निषेध केला.

यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, शिक्षक सेना जिल्हाप्रमुख प्रा.अंबादास शिंदे सर, कामगार सेनेचे विलास उबाळे, उपशहर प्रमुख जेम्स आल्हाट, उपशहर प्रमुख दीपक भोसले, किरण बोरुडे, माजी नगरसेवक सुनील त्रिपाठी, माजी नगरसेवक पप्पू ठुबे, सावेडी उपनगराचे उपप्रमुख प्रशांत पाटील, सुनील भोसले,

सचिन शेंडगे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकारी शहर जिल्हाध्यक्ष अनिकेत कराळे, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषा भगत, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माथाडी कामगार सेना विभाग शहरप्रमुख गौरव ढोणे, युवासेना विधानसभा प्रमुख आनंद राठोड,

किशोर कोतकर, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, अशोक जावळे, आनंद जवंजाळ, केशव दरेकर, गणेश आपरे, महावीर मुथा, अमित शिंदे, विनोद दिवटे, अमोल सानप, रमेश आव्हाड, जयराम आखाडे, नितीन जगधने, महावीर मुथा, महादेव बुरा, दीपक गांगुर्डे, प्रकाश शिंदे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किरण काळे म्हणाले, दहशतवाद्यांनी अगोदर रेकी करून पूर्वनियोजित कट आखून हल्ला घडवून आणला. धर्म विचारून हिंदू असल्याची खात्री करत निष्पापांचे बळी घेतले. ही राजकारण करण्याची वेळ नाही. मात्र मागील अकरा वर्षांपासून हिंदूंचेच सरकार असून देखील हिंदुस्थानातील ‘हिंदू खतरे मे आहे’ हे भयान वास्तव आहे. संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली आहे.

अनेक ठिकाणी चेक पोस्टवर बंदोबस्तच नव्हता असं पर्यटक सांगत आहेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणा कट शिजत असताना काय करत होत्या? पुलवामा हल्ल्या वेळी देखील यंत्रणा अपयशी ठरल्या होत्या. पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्रमंत्री यांना प्रचंड संरक्षण, कडेकोट बंदोबस्त आहे. तसंच संरक्षण सामान्य भारतीयांना केव्हा मिळणार?, असा संतप्त सवाल काळे यांनी केला आहे.