अहमदनगर Live24 टीम, 18 ऑक्टोबर 2021 :- नगर तालुक्यात वाळकी येथे दोन शेजा-यांमध्ये सायकल लावण्याच्या किरकोळ कारणातून वाद झाले. या वादात जावेद गनीभाई तांबोळी वय 35 या तरुणाच्या डोक्यात दगड घालून व धारदार शस्त्राने मारून निर्घृण खून करण्यात आला.
ही घटना नगर तालुक्यातील वाळकी येथील स्टेट बँके समोर चौकात घडली. याबाबत अधिक माहिती अशी कि, वाळकी येथे शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात सायकल लावण्याच्या कारणावरुन वाद झाले.

file photo
या वादाच्या रागातून वाळकी येथील भांड्याचे व्यापारी गनीभाई तांबोळी यांचा मुलगा जावेद वय 35 याला धारदार शस्त्राने व डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्यात आला.
या घटनेने वाळकी हादरली असून काही काळ तणाव निर्माण झाला.या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यानी मृतदेह शवविच्छेनाकरीता पाठवला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम