पाट पाणी आणणे व जिरायत शेतीसाठी पाणी हेच माझे मुख्य ध्येय – अॅड. ढाकणे

जनतेच्या हितासाठी विधानसभा निवडणुक लढवल्या. मात्र, यामध्ये माझा पराभव झाला तरी सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून न्याय देण्याचा प्रयत्न केला, येथून पुढच्या काळातही तो संघर्ष सुरूच राहील.

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह परिसरात आजपर्यंतच्या एकाही लोकप्रतिनिधींनी शेतीच्या पाणी प्रश्नासाठी लढा न दिल्याने हा जिरायत भाग अजूनही पाण्यापासून वंचित राहिला आहे.

त्यामुळे शेवगाव तालुक्याच्या पूर्वभागात शेतीसाठी हक्काचे पाणी कसे आणता येईल हेच माझे मुख्य ध्येय असून, सदरील प्रश्न पुर्णत्वास नेण्यासाठी मी पुढाकार घेऊन खासदार निलेश लंके यांना सोबत घेवून हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांनी सांगितले.

अॅड. ढाकणे यांनी शेवगाव तालुक्यातील चेडे चांदगाव, सुळे पिंपळगाव, ठाकूर पिंपळगाव, बोधेगाव परिसरातील वाडी- वस्ती शेत शिवारात जावून शेतात काम करणाऱ्या शेतकरी महिला, पुरुष, घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पाट पाणी आणण्यासाठी संघर्ष करणार : अॅड. ढाकणे
ढाकणे यांनी बोधेगाव येथे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर बसून शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांशी संवाद साधला. यावेळी परिसरातील पाण्याची समस्या ओळखून या परिसरात जायकवाडीचे पाणी आणण्यासाठी माझा संघर्ष सुरू असून पाटपाणी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही ढाकणे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना दिली.