नगर पुणे रेल्वे मार्ग हा माझा ड्रीम प्रोजेक्ट ! खासदार नीलेश लंके यांनी स्पष्टच सांगितलं…

Published on -

Nagar Pune Railway : नगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपुर्ण ठरणाऱ्या नगर-पुणे रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी खासदार नीलेश लंके हे सातत्याने प्रयत्नशिल असून त्या अनुषंगाने त्यांनी या महत्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात पुण्यात रेल्वेचे उपमुख्य अभियंत्यांच्या कार्यालयात बैठक घेउन आढावा घेतला. लवकरच या प्रकल्पाच्या कामाला सुरूवात होईल असा विश्वास खा. लंके यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

या महत्वाकांक्षी प्रकल्पासंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी संसदेतही लक्ष वेधले होते. या मार्गाचे महत्व स्पष्ट करताना सुपा, रांजणगांव गणपती, कारेगांव या औद्योगिक वसाहती, रांजणगांव गणपती सारखी प्रसिध्द तिर्थक्षेत्रे व इतर अनेक विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांचा या मार्गात समावेश असल्याने निदर्शनास आणून दिले.

प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूकीसाठी हा मार्ग अत्यंत फायदेशीर ठरणार असून स्थानिक पातवळीवर मोठया प्रमाणावर औद्योगिक वाढीस मदत होईल असा विश्वास खा. लंके यांनी व्यक्त केला.  या महत्वपुर्ण बैठकीस रेल्वेचे उपमुख्य अभियंता मोहित सिंग यांच्यासह शाखा अभियंता व इतर अधिकारी, तांत्रीक पथक व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

माझा ड्रिम प्रोजेक्ट
नगर-पुणे रेल्वे मार्ग हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी ही दर्जात्मक आणि गुणवत्तापुर्ण व्हाची यासाठी मी कटीबध्द आहे. या कामामध्ये काही अडचण आल्यास निःसंकोचपणे माझ्याशी संपर्क साधावा.

आवश्यकता भासल्यास रेल्वेमंत्री महोदयांशी मी चर्चा करून प्रश्न माग लावण्याचा प्रयत्न करेल अशी ग्वाही खा. लंके यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना दिली. या प्रकल्पामुळे नगर व पुणे जिल्ह्यामधील सबंध अधिक मजबूत होणार असून औद्योगिक, धार्मिक आणि मजबूत होणार औद्योगिक, धार्मिक आणि सामाजिक प्रगतीचे नवे पर्व सुरू होणार असल्याच्या प्रतिक्रीया खा. लंके यांनी दिली.

सुप्यात रेल्वे स्थानक, मालधक्का
या रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्याबरोबर सुपा येथे रेल्वे स्टेशन तसेच मालधक्का उभारणीची मागणी खा. लंके यांनी या बैठकीत केली. सुमारे १२५ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गामुळे नगर व पुणे जिल्ह्यातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून या भागातील नागरीक, उद्योग, शेतकरी,व्यापाऱ्यांसाठी हा प्रकल्प लाभदायक ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe