नागवडे कारखाण्याचा आज होणार फैसला!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत १९८८२ मतदानापैकी १६९७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावता एकूण (८५.४० %) टक्के मतदान झाले तर सोसायटी मतदार संघात ४१ पैकी ४१ मतदारांनी मतदानाचा हक्क दिवसभरात बजावला आहे.

२१ जागांसाठी ४४ उमेदवारांचे नशीब मतपेटीत बंद झाले आहे. आज निकालात सभासदांनी कोणावर संक्रात बसविली आहे हे स्पस्ट होणार आहे.

थोड्याच वेळात श्रीगोंदा येथील शासकीय गोडाऊनमध्ये मतमोजणी सुरु होणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुधाकर भोसले व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद कुलथे यांनी दिली.

दरम्यान कारखान्याच्या मतदानासाठी दुपारी बारा वाजेपर्यत अत्यल्प प्रमाणात मतदान झाले मात्र दुपारनंतर मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्याने मतदानाची टक्केवारी वाढली

तर संध्याकाळी उशिरापर्यंत लिंपणगाव येथील मतदान सभासदांची रांग लागल्याने केंद्रावर उशिरा पर्यंत मतदान प्रक्रिया चालू होती. या निवडणूकीकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe