…कामाच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी – भाजप सोबत, कोतकर मात्र गायब

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून शहरातील राजकरण आणि नेतेमंडळी हे चांगलेच चर्चेत आहेत. दरम्यान शहरातील साफसफाई व खड्डे दुरुस्ती कामाची पाहणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व भाजपचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी संयुक्तपणे पाहणी केली.

मात्र यावेळी स्थायी समितीचे नवे सभापती मनोज कोतकर अनुपस्थित होते. कोतकर यांच्यावर राष्ट्रवादी व भाजपनेही ते आमचेच असल्याचा दावा केला आहे.

दरम्यान आमदार-महापौर आज सोबत पाहणी करत असताना आपल्या पक्ष प्रवेशाबाबत कोणी प्रश्न उपस्थित करतील कि काय? यामुळे कोतकरांनी आजच्या या उपक्रमाला पाठ दर्शवली अशा चर्चा रंगू लागल्या होत्या.

दरम्यान, आमदार व महापौर यांच्या साफसफाई व खड्डे बुजविण्‍याच्‍या कामाच्या संयुक्त पाहणीच्या वेळी कामचुकार अधिकाऱ्यांची गय नाही, असा इशारा आ.जगताप यांनी दिला.

नगर शहरातील विविध प्रश्‍नासंदर्भात मनपा अधिकारी, इंजिनिअर, विभाग प्रमुखांसमवेत झालेल्या बैठकीमध्‍ये विविध प्रश्‍नावर चर्चा करून उपाय योजना करण्‍याचे आदेश देण्‍यात आले होते.

या पार्श्‍वभूमीवर शहरामध्‍ये विविध ठिकाणी रस्‍त्‍यावरील साफसफाई सुरू करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी महापौर वाकळे म्‍हणाले, नगर शहरामध्‍ये पावसामुळे रस्‍त्‍यावर खड्डे पडले आहेत.

या खड्डयामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला, परंतु पावसामध्‍ये डांबराने खड्डे बुजविण्‍याचे काम हाती घेता येत नाही. आता पाऊस उघडला आहे. नगर शहरातील सर्व खड्डे बुजविण्‍याचे काम हाती घेणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment