Ahmednagar News:शिर्डी लोकसभा मतदारसंघातील खासदार सदाशिव लोखंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे पुढे ते शिदे गटाचे उमेदवार मानले जातात.
तर दुसरीकडे भाजपसोबत युती असलेले रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनीही या जागेवर दावा केला आहे. भाजपने ही जागा आपल्यासाठी सोडावी अशी त्यांची मागणी आहे.
असे असले तरी भाजपचे मात्र येथे वेगळेच प्रयत्न सुरू आहेत. ना लोखंडे ना आठवले भाजपने या मतदारसंघात शत प्रतिशत भाजप आणण्याच चंग बाधून तयारी सुरू केली आहे.
हा मतदारसंघ पक्षाच्या ‘लोकसभा प्रवास योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानुसार १० ते १३ सप्टेंबर या काळात दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल या मतदारसंघात येणार असून प्रत्येक तालुक्यात दौरा करणार आहेत.
राज्यातील १४ लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आणण्यासाठी संघटनात्मक पातळीवर काम सुरू झाले आहे. त्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे.
पक्षाच्या वतीने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लोकसभा मतदार संघाचे प्रमुख आणि आ. डॉ राहूल आहेर यांना प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
प्रल्हाद पटेल पुढील तीन दिवस शिर्डीत येत आहेत. या दौऱ्यात अकोले संगमनेर राहाता कोपरगाव श्रीरामपूर नेवासा या तालुक्यात मंत्री प्रल्हाद पटेल जनसंघ, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते महीला आघाडी योजनांचे लाभार्थी यांच्याशी थेट गावात आणि बुथ स्तरापर्यत जावून संवाद साधणार आहेत.