अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी रात्री पार पडला. यंदा एकूण 43 जणांच्या नावाची निश्चित झाली व अगोदरच्या अकरा11 मंत्र्यांनी आपले राजीनामे राष्ट्रपतींकडे सुपूर्द केले आणि राष्ट्रपतींनीदेखील ते तत्काळ मंजूर केले.
केवळ राजीनामे देऊन हे मंत्री थांबले नाहीत, तर त्यांनी लगोलग आपल्या ट्विटर खात्यावर जाऊन आपलं पदही अपडेट केलं.
तुम्ही मंत्रीपदाचा राजीनामा द्या आणि खुर्ची रिकामी करा, असा फोनवरून आलेला आदेश शिरसावंद्य मानत सर्वच्या सर्व मंत्र्यांनी तात्काळ राजीनामे दिले मात्र आता प्रश्न पडतो तो हे फोन केले कोणी ? हा फोन साक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा होता का ? तर नाही स्वतः पंतप्रधानांनी हे फोन केलेच नाहीत.
मंत्रीमंडळात कुणाचा समावेश करायचा आणि कुणाला डच्चू द्यायचा, याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला असला, तरी हे फोन स्वतः पंतप्रधानांनी केलेच नाहीत. आता तुम्हाला वाटेल की हा फोन गृहमंत्री अमित शाहांनी केला असेल.
मात्र हा अंदाजही साफ चुकीचा आहे. अमित शाहा हे केंद्र सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री असले तरी मंत्रीमंडळाबाबतचे निर्णय हे स्वतः मोदीच घेत असल्याचं यापूर्वीदेखील सिद्ध झालं आहे.
पंतप्रधान मोदींच्या पहिल्या कार्यकाळातदेखील मंत्रीमंडळ विस्ताराच्या वेळी अमित शाहांच्या निर्णयप्रक्रियेतील सहभागाबाबत चर्चा झाली होती. मात्र मोदींनीच अंतिम नावं निश्चित केल्याचं समोर आलं होतं.
तर हा फोन होता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या मंत्र्यांची नावं निश्चित केली आणि कुठल्या विद्यमान मंत्र्यांना नारळ द्यायचा, या यादीवर शिक्कामोर्तब केलं,
तेव्हा ती यादी पोहोचली भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हाती. मग नड्डा फोन घेऊन एका जागी बसले आणि लागोपाठ 11 फोन लावत सर्वात अवघड असणारं काम पूर्ण केलं.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम