Ahmednagar News : खरं तर देवदूत, मसिहा कैवारी, हे सगळे शब्द फक्त परिकथेत चित्रपटात ऐकायला मिळतात, पण आजच्या कलीयुगात कोणी म्हणालं की, खरंच देवदूत आहे, कोणी जो तुम्हाला अडचणीच्या काळात मदतीचा हात देईल, तर १०० टक्के आमदार निलेश लंके यांचे नाव अग्रभागी आहे.
पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथील साळवे कुटुंबियांतील ९-१० वर्षांची तेजस्विनी साळवे या चिमुरडीचे अँपेडीस ४-५ दिवसांपूर्वी फुटल्याने चिमुरडीला वेदना सहन होईना.
साळवे कुटुंबीय ३ दिवसांपासून उपचारासाठी पैशाअभावी अगदी मदतीसाठी वणवण फिरत होते, पण कुठेच मदत भेटत नव्हती, कोणीतरी एकाने सांगितले की, तुम्ही आ. लंके यांच्याकडे जा, तुम्हाला १०० टक्के मदत मिळेल, दुसऱ्या दिवशी साळवे तेजस्विनीला घेऊन पारनेरला लंके यांच्या कार्यालयात आले.
तिथे आ. लंके यांना भेटून सर्व कहाणी सांगितली, क्षणाचाही विलंभ न लावता आ. लंके यांनी त्यांच्या आरोग्य कक्षाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब कावरे यांना बोलावून पुढील उपचारासाठी सोय करण्याच्या सूचना दिल्या.
डॉ. कावरे यांनी पुणे येथील ससून रुग्णालयातील डॉ. किरण जाधव यांना तेजस्विनीची फाईल पाठवली. डॉ. किरण जाधव यांनी सांगितले की, तेजस्विनीला पुण्याला ताबोडतोब पाठवून द्या.
डॉ. किरण जाधव यांचा निरोप मिळताच आ. लंके यांनी आपले सहकारी डॉ. कावरे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अर्जुन भालेकर यांना तेजस्विनीला पुण्याला पोहचण्याची सोय करण्यास सांगितले.
डॉ. किरण जाधव यांनी सर्व तपासण्या केल्या व तिची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. सायंकाळी तेजस्विनीवर ससून रुग्णालय येथे शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.
यामुळे तेजस्विनीचे प्राण वाचले आणि पुर्नजन्म झाला. आ. लंके राजकारणाच्या वेळेस राजकारण जरूर करतात, पण अडल्या नडलेल्यांना तन, मन, धनाने मदत करतात, असा अनेकांचा अनुभव आहे.