अहिल्यानगर जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेट पोहोचले धोकादायक पातळीवर ! आरोग्यास घातक, रासायनिक खतांच्या वापराने परिणाम, पहा सविस्तर रिपोर्ट..

Published on -

अहिल्यानगरमध्ये जिल्ह्यातील पाणीसाठे तपासल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यातील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण घातक पातळीवर पोहोचले आहे. त्यामुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील तब्बल नऊ तालुक्यांतील विविध गावांत नायट्रेटचे प्रमाण हे प्रतिलिटर ३० ते ४९ मिलीग्रॅम असल्याचे दिसून आले आहे. ४५ पेक्षा जास्त प्रमाण झाले तर आरोग्यास धोका निर्माण होतो.

का वाढले पाण्यात नायट्रेटचे प्रमाण?

रासायनिक खतांचा अलीकडे वारेमाप वापर होत असल्याने जमिनीचा पोत खराब होत आहे. शिवाय खत जमिनीत झिरपून पाण्यात मिसळत असल्याने पाण्यात नायट्रेटचे प्रमाणही वाढत आहे.

कोणकोणत्या तालुक्यांत झाली तपासणी?

जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील विविध गावांमध्ये घेतलेल्या पाण्याच्या १०० नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे. नायट्रेटचे प्रमाण तपासण्यासाठी पाण्याचा नमुना प्रयोगशाळेत पाठवून त्याची तपासणी करावी लागते. गेल्या महिन्यात जिल्ह्यातील सार्वजनिक विहिरींसह अन्य जलस्रोतांतील पाण्याचे नमुने घेतल्यानंतर अनेक जलस्रोतांत नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे.

जिल्ह्यात पारनेर, नगर, संगमनेर, अकोले, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, शेवगाव आणि श्रीरामपूर तालुक्यांतील गावात नायट्रेटचे प्रमाण वाढल्याचे आढळून आले आहे. जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने मान्सूनपूर्व व मान्सूनपश्चात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील गावांमधील विहिरी, कुपनलिकांसह जलस्रोतांच्या ठिकाणांवरून पाण्याचे नमुने घेऊन तपासले. यात नऊ तालुक्यांतील विविध गावांत नायट्रेटचे प्रमाण हे प्रतिलिटर ३० ते ४९ मिलीग्रॅम असल्याचे दिसून आले आहे.

पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे सुरक्षित प्रमाण प्रतिलिटर ४५ मिलीग्रॅमपेक्षा जास्त नसावे. मात्र, भूजल विभागाच्या प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या तपासणीत जिल्ह्यातील २ तालुक्यांतील विविध गावांतील १०० पाणी स्रोतांत हे प्रमाण ३० ते ४९ मिलीग्रॅम असल्याचे दिसून येते. यात पारनेर तालुक्यातील ५, नगर ६, संगमनेर १५, अकोले ४, श्रीगोंदा ५, जामखेड ७, पाथर्डी २९, शेवगाव २८ आणि श्रीरामपूर तालुक्यातील एका पाणी स्रोताचा समावेश आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe