Ahmednagar News : आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत राजकीय नेत्यांना नो एन्ट्री !

Published on -

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील ग्रामस्थांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेणारे सोनेवाडी हे कोपरगाव तालुक्यातील दुसरे गाव ठरले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकार विरोधात तीव्र आंदोलन हाती घेतले आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्णय जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे.

त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोनेवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत बैठक घेत सकल मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. त्यांनी त्यांच्या गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली. तसे निवेदन ग्रामपंचायतीच्या प्रशासनाला देण्यात आले.

बैठकीत सर्वानुमते गावामध्ये राजकीय पुढाऱ्यांना येण्यास बंदी, गावातील कोणत्याही नागरिकांना राजकीय कार्यक्रमास न जाण्याचा निर्णय, मराठा समाजाला आरक्षण वेळेपर्यंत साखळी पद्धतीने धरणे आंदोलन,

आरक्षण वेळेपर्यंत मतदान प्रक्रियेवर बहिष्कार आदी प्रकारचे निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आले. कालच्या झालेल्या बैठकीमुळे राजकीय पुढाऱ्यांची मोठी गोची होणार असून त्यांनीही मराठा समाजाच्या आंदोलनासाठी पुढाकार घ्यायला हवा, अशी चर्चा यावेळी रंगली. वरील विषयाचे व पुढाऱ्यांच्या गाव बंदीचे बॅनर चौकात लावण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

यावेळी निरंजन गुडघे, उपसरपंच संजय गुडघे, किशोर जावळे, चिलु जावळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे, कर्णा जावळे, आबासाहेब जावळे, दिगंबर जावळे, संतु दहे, प्रशांत जावळे, धोंडीराम जावळे, रामदास जावळे, भाऊसाहेब खरे, मच्छिद्र गुडघे, विनायक चव्हाण, पुंजाहरी आव्हाड, किशोर गुडघे, सार्तक गुडघे,

संतोष जावळे, संदीप दहे, किरण शिंदे, सागर जावळे, शिवाजी दहे, रंगनाथ गुडघे, गोविंद जाधव, परसराम जावळे, विजय मिंड, रावसाहेब मिंड, हेमराज जावळे, अण्णासाहेब कांदळकर, संजय गुडघे, सचिन गुडघे, सुरेश जावळे, सुमित पासलकर, लहानु गोडसे, अर्जुन जावळे, खंडेराव जाधव आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News