Ahmednagar News : नेवासा तालुक्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत गटबाजीमुळे सुरु आहे. मात्र या अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाला बसत आहे. कारण या सुरूअसलेल्या अंतर्गत गटबजीमुळे अनेक स्थानिक कार्यकर्ते पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे स्थानिक नेतृत्वावर आत्मपरीक्षणाची वेळ आली आहे.
नुकताच तालुक्यातील शिकारी येथील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी आमदार शंकरराव गडाख यांच्या गटात प्रवेश केला आहे. मागील काही दिवसांपासून तालुक्यात भाजपचा प्रभाव कमी होत चालला असून कार्यकर्ते इतर पक्षात प्रवेश करत आहेत.

दरम्यान गडाख यांच्या गटात प्रवेश केलेल्या युवकांनी माजी आमदार मुरकुटे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. खालच्या पातळीवर राजकारण करुन सामाजिक अशांतता निर्माण करत असल्याने आम्ही विकास कामांना साथ म्हणून गडाख गटात आलो आहोत.
नेवासे नगरपंचायतच्या माध्यमातून शहराचा कायापालट होत असल्याने आम्ही प्रभावित झालो असेही त्यांनी सांगितले. तसेच माजी आमदार मुरकुटे यांचे पक्षवाढीत कुठलेही योगदान नसून, प्रामाणिक कार्यकर्त्यांची भाजपमध्ये घुसमट होत आहे.
मुरकुटे यांच्यासाठी निवडणुकीत प्रमाणिकपणे काम करून भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न केला. परंतु मुरकुटे यांच्याकडून वेळोवेळी फसवणूकच झाली. कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी कार्यकर्त्यांचे खच्चीकरणच करण्यात आले.
त्यामुळे यापुढे आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्णय घेतल्याचे आबासाहेब खलाटे यांनी सांगितले.
दरम्यान तालुक्यातील नांदूर शिकारी येथील भाजप कार्यकर्त्यांनी गडाख गटात प्रवेश केल्यामुळे तालुक्यात भाजपाला मोठे खिंडार पडले असून माजी आमदार मुरकुटे यांच्या कार्यपद्धतीवर कार्यकर्ते नाराज असल्याचे आता ते बोलून दाखवत आहेत.
आबासाहेब खलाटे, विठ्ठल खलाटे, भास्कर खलाटे, सुनील खलाटे, आजीनाथ खलाटे, बबन खलाटे, मोहन खलाटे, मिश्रू खलाटे, छबूराव खलाटे, सतीश कासारे, अशोक कासारे, अशोक खलाटे, मिनीनाथ खलाटे, ज्ञानेश्वर खलाटे, रमेश खलाटे, संतोष खलाटे, अच्युत आठरे यांनी गडाख गटात प्रवेश केला.