अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2021 :- ईडी संदर्भात माझ्यावर टीका करणा-याला माझ नावच कसं घेता आलं असं म्हणत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी किरीट सोमय्यांची खिल्ली उडवली तर ईडी बाबत प्रश्नांची उत्तरे दिली आहेत
त्यामुळे कार्यकर्त्यांनी भ्रमित होऊन जाऊ नये केंद्र सरकारकडून महा विकास आघाडीच्या नेत्यांना त्रास देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचे देखील ना. तनपुरे यांनी म्हटले आहे.

राहुरी शहरातील केशर मंगल कार्यालायत राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यकर्ता शिबिर संपन्न झालय…. प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माहिती तंत्रज्ञान विभागाचे अध्यक्ष जितेंद्र सरडे हे होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगाधर जाधव होते तर व्यासपीठावर पंचायत समिती च्या सभापती बेबीताई सोडनर,उपसभापती प्रदिप पवार, जि.प.सदस्य धनराज गाढे, मच्छिंद्र सोनवने, रविंद्र आढाव,
सुरेश निमसे, विठ्ठल मोकाटे, बाळासाहेब लटके, धीरज पानसंबळ, ज्ञानेश्वर बाचकर, बाळासाहेब खुळे,प्रभाकर गाढे सुनिल आडसुरे, विजय कातोरे आदी उपस्थित होते.सुञसंचालन संतोष आघाव यांनी केले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम