आज अनेक लोक बिझनेस सुरु करतात परंतु अपुरी इच्छाशक्ती व अपुरी हिम्मत यामुळे बिझनेस मधेच स्टॉप करतात. परंतु असे अनेक लोक आहेत की एक छोटीशी आयडिया घेऊन बिझनेस स्टार्ट करतात व जिद्दीच्या जोरावर मोठा बिझनेस सुरु करतात.
येथे आपण अशीच एक दोन मित्रांची यशोगाथा पाहणार आहोत. त्यांनी चष्मा विकून करोडोंची कंपनी आज उभी केली आहे. चष्मा विकणे ही अत्यंत छोटी गोष्ट तुम्हाला वाटेल. पण यातच या दोघांनी आपला हात अजमावत करोडो रुपयांचा बिझनेस उभा केला आहे. या दोन मित्रांनी ClearDekho नावाचा करोडोचा स्टार्टअप उभा केला आहे. 2016 मध्ये याची सुरवात झाली व पाहता पाहता याचा विस्तार झाला.
दोन मित्रांना अशी सुचली आयडिया
शिवी सिंह आणि सौरभ दयाल यांनी ClearDekho या कम्पनीची सुरवात केली. शिवी सिंह हे नोकरी करत होते. या दरम्यान त्यांच्या लक्षात आले की, लहान खेडे आणि लहान शहरांमध्ये डोळ्यांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या लोकांना योग्य आणि चांगल्या दर्जाचे चष्मे उपलब्ध होत नाहीत.
यामुळे त्यांनी छोट्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये चांगल्या दर्जाचे चष्मे देता यावेत यासाठी CleaRDekho ची स्थापना केली. सौरभ सिंह यांनी देखील विप्रो, एचसीएल आणि पेटीएम सारख्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. जेव्हा शिवी याने त्याला या आयवेअर बिझनेसची आयडिया सांगितली तेव्हा तेव्हा दोघांनी मिळून हा बिझनेस सुरु केला.
100 पेक्षाही जास्त आहेत स्टोअर्स
सौरभ आणि शिवी या दोघांनाही आपापल्या क्षेत्रात चांगला अनुभव होता. त्यांनी हाच अनुभव वापरत आपला बिझनेस ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने सुरु केला. त्यांना सुरुवातीपासूनच चांगला प्रतिसाद मिळाला.
सध्या त्यांची 100 हून अधिक स्टोअर भारतात उघडली गेली आहेत. त्यांच्या चष्मांच्या किमतीतही अगदी माफक आहेत. 200 ते 600 रुपयांच्या दरम्यान या चष्म्याच्या किमती आहेत. त्यामुळे अगदी ग्रामीण भागातील लोकही ते सहज खरेदी करू शकतात.
आज उभी आहे करोडोंची कंपनी
छोट्या संकल्पनेतून सुरु केलेली ClearDekho कंपनी आज करोडोंची कंपनी बनली आहे, मागील आर्थिक वर्षात या कंपनीने 7.50 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू प्राप्त केला होता. कंपनी आता आगामी 2 वर्षात व्यवसायात काही बदल करणार आहेत, जेणेकरून त्यांची कंपनी छोट्या गावांत देखील चांगल्या दर्जाचे Eyewear देऊ शकतात.
आता तुमच्या लक्षात आले असेल की कोणतीही गोष्ट छोटी नसते. चष्मा विकणे या संकल्पनेतून सुरु झालेला बिझनेस आज या मित्रांना कोटी रुपये कमावून देत आहे.