अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- खाजगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा ठरणारी 10 जुलैची अधिसूचना रद्द झाल्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले असून, शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आलेले आंदोलन व पाठपुराव्याला आखेर यश आले आहे.
या आंदोलनात सक्रीय सहभाग घेणार्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी अभिनंदन केले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली. खाजगी शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या सेवा महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील तरतुदीच्या आधीन आहे. या नियमावलीतील नियम क्रमांक 19 नुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना देय असून, नियम क्रमांक 20 (2) नुसार भविष्य निर्वाह निधी योजनेचा लाभ देय आहे.
जुनी पेन्शन योजना व भविष्य निर्वाह निधी योजनेच्या लाभापासून शिक्षक कर्मचार्यांना वंचित करण्यासाठी शासनाने 10 जुलै 2020 ला अधिसूचना प्रकाशित करून नियम क्रमांक 2 नियम क्रमांक 19 चे नियम क्रमांक 20 (2) मध्ये सुधारणा करण्याचे प्रस्तावित केले होते. या घटनाबाह्य अधिसूचनेला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने तीव्र आक्षेप नोंदवून हरकत घेतली होती. तसेच राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारिणीने तीव्र आक्षेप व हरकत नोंदवून 10 ऑगस्ट रोजी राज्यभर अन्नत्याग आंदोलन केले होते. या आंदोलनाला शिक्षक कर्मचार्यांनी अभूतपूर्व सहकार्य केले.
तसेच शिक्षक आमदार गाणार यांनी विधान परिषदेचे सभापती यांना हक्कभंगाची कारवाई करण्याबाबतची विनंती केली होती. तर 20 जुलै रोजी संबंधित अधिसूचनेला आक्षेप हरकत नोंदवित संबंधित घटनाबाह्य अधिसूचना रद्द घोषित करण्याची मागणीचे निवेदन राज्यपाल यांना देण्यात आले होते. या अधिसूचनेसाठी घेतलेला आक्षेप व हरकती विचारात घेऊन शासनाने 10 जुलै 2020 ची घटनाबाह्य अधिसूचना रद्द करण्याचे घोषित केले आहे. ही बाब स्वागतार्ह असून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे आमदार गाणार यांनी म्हंटले आहे.
खाजगी शाळांतील शिक्षक, कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्यासाठी शासन निर्णय 29 नोव्हेंबर 2010 रद्द होण्याची गरज आहे. त्या दृष्टीने देखील शिक्षक परिषद पाठपुरावा करीत असल्याची माहिती बाबासाहेब बोडखे यांनी दिली. 10 जुलैची अधिसूचना रद्द होण्यासाठी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनात अहमदनगर जिल्ह्यातून बाबासाहेब बोडखे, प्रा.सुनिल पंडित, शरद दळवी, शशिकांत थोरात, विनायक कचरे, तुकाराम चिक्षे, चंद्रकांत चौगुले, सखाराम गारूडकर,
अशोक झिने, रावसाहेब चौधरी, प्रा. सुनिल सुसरे, सुभाष ढेपे, विठ्ठल ढगे, सौ. अनिता सरोदे, सुलभा कुलकर्णी, बबन शिंदे, विनायक साळवे, प्रा.श्रीकृष्ण पवार, प्रा. बाबासाहेब शिंदे, सर्जेराव चव्हाण, इकबाल सर, निलेश बांगर, नितीन म्हस्के, देवकर सर, अरूण राशिनकर, वसंत गायकवाड, उकीर्डे सर, अरविंद आचारी, अनिल आचार्य, शिवाजी धाडगे, सुरेश विधाते, अविनाश आपटे, थोरे सर, प्रदीप बोरूडे, युनूस शेख, ईकबाल काकर आदिंसह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
- शेतात, घरात साप निघाला ? पकडू नका अन्यथा होईल 7 वर्षांची शिक्षा
- ‘असे’ लावा आपल्या मोकळ्या जागेवर मोबाइल टॉवर; होईल खूप कमाई
- एलआयसीची भन्नाट योजना ! एकदाच भरा पैसे आणि दर महिन्याला मिळवा 5 हजार रुपये