अहमदनगर Live24 टीम, 02 नोव्हेंबर 2021 :- नगर शहरातील बोल्हेगाव परिसरातील गांधीनगर भागामध्ये महिलांच्या दोन गटांमध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला. त्याची फिर्याद दाखल करण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात आल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन गट एकमेकांसमोर भिडले.
त्यापैकी एका गटाने चाकूने व कोयत्याने दोघांवर हल्ला चढवला. याप्रकरणी पोलिसांनी फिर्यादी सचिन निकम यांचे फिर्यादी वरून गणेश कु-हाडे, अक्षय डाके, किरण सोमनाथ, सागर डाके,

गौरव जगधने, बाळासाहेब वाघमारे, प्रथमेश चौरे यांचे विरुद्ध खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन गुन्ह्यास मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव मा. विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना सादर केला होता. सदर प्रस्तावास त्यांनी मंजुरी दिली.
आज रोजी तपासी अधिकारी डीवायएसपी संदीप मिटके यांनी आरोपीताना विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर येथे हजर केले असता विशेष मोक्का न्यायालय अहमदनगर यांनी आठ दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान आरोपी आकाश भाऊसाहेब डाके व गणेश भगवान कु-हाडे यांच्याविरुद्ध अनेक गुन्ह्यांची नोंद आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम