आता कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारासाठी मुंबई – पुणेला जाण्याची आवश्यकता नाही…जाणून घ्या कारण

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- धामणगावच्या नंदी हिल्स येथील एसएमबीटी हॉस्पिटलने मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्यातून कर्करोगावरील सर्व सुविधायुक्त आधुनिक उपचार सुरू होणार आहेत.

सर्व सुविधायुक्त स्वतंत्र कॅन्सर सुविधा सुरु केल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील कॅन्सर रूग्णांना उपचारासाठी मुंबई-पुणे यांसारख्या मोठ्या शहरांत जाण्याची गरज पडणार नाही.

त्यांना अत्यंत माफक दरात उपचार मिळतील,असा आशावाद राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. एसएमबीटी हॉस्पिटलमधील कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे, उपसंचालक डॉ. पंकज चतुर्वेदी, महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. हर्षल तांबे आणि विश्वस्त डॉ. जयश्री थोरात आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना महसूलमंत्री थोरात म्हणाले, की कोरोना महामारीने पुरेशा व दर्जेदार आरोग्य सुविधांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

फक्त मोठ्या शहरातल्या पंचतारांकित रुग्णालयांमध्येच चांगल्या आरोग्य सुविधा व उपचार मिळतात. मात्र आत हा गैरसमज एसएमबीटी रुग्णालयाने खोडून काढला आहे.

ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना अत्यंत माफक दरात उत्तम आरोग्य सेवा पुरवीत आहे. कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या पाहता,

मानवसेवेच्या हेतूने एसएमबीटीने देशातील अग्रगण्य टाटा मेमोरिअल इन्स्टिट्यूटच्या सहकार्याने स्वतंत्र उपचाराची व्यवस्था केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe