आता लहान मुलांना ही ईडी समजायला लागली… महसूलमंत्र्यांनी लगावला टोला

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  20 फेब्रुवारी 2022 :- ‍2014 नंतर राजकारणात मोठे बदल झाले. आता लहान मुलांना ही ईडी समजायला लागली. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर आता राजकारणासाठी केला जातोय.आता नेत्यांच्या बायका पोरापर्यंत तपास यंत्रणा जात असतील तर हे निषेधार्थ आहे.

अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारचे लवकरच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडणार आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबत चर्चा रंगली आहे. पण, ‘अध्यक्ष निवडीवर जास्त चर्चा करण्याची गरज नाही. राज्यपालांनी सुद्धा निवड करण्याबाबत आम्हाला पत्र पाठवलं आहे.

निवडीबाबत आम्ही नियमात बदल केले मात्र ते चुकीचे नाही, राज्यपाल नियमांना पाठिंबा देतील’ असा दावा थोरात यांनी केला आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे शिर्डीच्या दौऱ्यावर होते.

यावेळी पत्रकारांशी बोलत असताना विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवर भाष्य केलं. ही ईडी समजायला लागली. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर आता राजकारणासाठी केला जातोय.

आता नेत्यांच्या बायका पोरापर्यंत तपास यंत्रणा जात असतील तर हे निषेधार्थ आहे. जर यात चुकीच्या पद्धतीने त्रास दिला जात असेल तर तो सहन होत नाही, असंही थोरात म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe