Ahmednagar News : महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे बुऱ्हाणनगर पाणी योजनेची जलवाहिनी फुटल्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
सहा महिन्यात ५५ वेळा जलवाहिनी फुटली. त्यामुळे दहा वेळेस या भागात पाणी सुटले. जलवाहिनीचे काम तातडीने पुर्ण केले नाही तर शिवसेना स्टाईल संबंधीत ठेकेदाराला झोडपण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी दिला.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2022/06/download-2-4.jpg)
नगर सोलापूर महामार्गावर रस्ता रुंदीकरणाचे काम जेएचव्ही कंपनी मार्फत युध्दपातळीवर चालू आहे. या रस्त्याच्या बाजूनेच बुऱ्हाणनगर योजनेची जलवाहिनी गेली आहे. या जलवाहिनीतुन भागातील दरेवाडी,वाटेफळ, वांळुज, शिराढोण, वाटेफळ, दहीगाव , साकत , पारगाव रुईछत्तीसी, या आठ गावांना पाणी पुरवठा होत आहे .
मात्र कामादरम्यान ही जलवाहिनी वांरवार फुटत आहे. यामुळे या भागातील पाणी पुरवठा वारंवार खंडित होतो. एक लिकेज काढण्यासाठी एक दिवस लागतो. दर दोन तीन दिवसानी ही जलवाहिनी फुटते. यामुळे या भागात पाणी सोडता येत नाही.
आता पर्यत सहा महिन्यात केवळ दहा वेळेस पाणी सोडण्यात आले. मात्र विनाकारण नागरिकांना पाणीपट्टी भरावी लागत आहे. या भागात क्षारयुक्त पाणी असल्यामुळे टँकर तसेच जारचे पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकावर आली आहे.त्यामुळे यापुढे संबधीत ठेकेदाराला चांगलीच समज दिली.
परत जलवाहिनी फुटणार नाही याची काळजी घेऊ असे ठेकेदाराने सांगीतले. मात्र परत जलवाहिनी फुटली तर संबधीत ठेकेदारासह कर्मचाऱ्यांना झोडपून काढू असा इशारा यावेळी दिला.