आता अवैध वैद्यकीय व्यावसायिकांची खैर नाही: आरोग्य उपसंचालकांची जिल्हा रुग्णाालयास दिली अचानक भेट दिल्या ‘या’ सूचना

Published on -

Ahilyanagar News: जिल्ह्यातील मुला-मुलींच्या लिंग गुणोत्तरातील दरी कमी होण्यासाठी जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करा. त्याचसोबत अवैध वैद्यकीय व्यावसायिकांची शोध मोहिम प्रभावीपणे राबवत त्यांच्यावर कारवाई करा असे निर्देश आरोग्य उपसंचालक रेखा गायकवाड यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले.

आरोग्य उपसंचालक रेखा गायकवाड यांनी जिल्हा रुग्णालयास अचानक भेट देत विविध वॉर्डना भेटी देऊन पाहणी केली. त्यांनी रुग्णांसमवेत संवाद साधून त्यांना देण्यात येत असलेल्या सोयी-सुविधांची देखील त्यांनी माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, प्रशासकीय अधिकारी तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साहेबराव डवरे आदी उपस्थित होते.

श्रीमती गायकवाड यांनी गरोदर माता नोंदणी ते प्रसुती सेवा, प्रसुती प्रश्चात सेवा, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया आदींचाही विस्तृत आढावा घेतला. बैठकीस आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, अधिसेविका, परिसेविका आदींची उपस्थिती होती. दरम्यान आरोग्य उपसंचालक रेखा गायकवाड यांनी जिल्ह्यातील अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची चांगलीच पंचायत होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe