आता ‘या’ तालुक्यातील सहा गावात लॉकडाऊन…! व्यापाऱ्यांचा बंदला विरोध…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 27 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरवात होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने कडक पाऊले उचलली असून.

जिल्ह्यातील ज्या गावात १० पेक्षा जास्त रुग्ण सक्रिय आहेत अशी गावे लॉकडाऊन करण्याच्या सूचना नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकतेच अहमदनगर जिल्हयाच्या दौऱ्यावर आलेले असताना घेतलेल्या बैठकीत देत.

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. त्यानुसार उपजिल्हाधिकारी गाडेकर यांनी श्रीगोंदा तालुक्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला असता.

कोळगाव, मढेवडगाव, बेलवंडी, काष्टी, लोणी व्यंकनाथ, हांगेवाडी येळपणे या सात गावात १० पेक्षा जास्त रुग्ण सक्रिय असल्याने २३ सप्टेंबर ते दि.६ ऑक्टोंबर पर्यंत बंद करण्याचा निर्णय प्रशासननाने घेतल्याने असल्याचे सांगितले.

या निर्णयानंतर श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्याकडे काष्टी , कोळगाव ग्रामस्थांनी या बंदला निवेदन देत तीव्र विरोध केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe