आता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना ‘तेवढेच’ काम शिल्लक आहे आमदार विखे पाटील यांचे टीकास्त्र

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2022 :- पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकासाची घोडदौड वेगाने सुरू आहे. कोविड संकटानंतरही देशाच्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यात पंतप्रधानांना मिळालेले यश महत्वपूर्ण आहे.

सामान्य माणसाला योजनांचा थेट लाभ मिळत असल्याने कुठेही टीका करायला संधी नाही. पंतप्रधान मोदींचे नेतृत्व आता विश्वमान्य झाल्याचे सहन होत नसलेल्या

कॉँग्रेस नेत्यांना आपले अस्तित्व दाखविण्यासाठी मोदीजींच्या विरोधात बोलण्याची धडपड देशात सुरू केली आहे; परंतु जनाधारच कुठे मिळत नसल्याने असे वादग्रस्त वक्तव्य करून

चर्चेत राहण्यापलीकडे कोणतेही काम आता काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना राहिले नसल्याचा टोला आमदार विखे पाटील यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्येच्या भावनेतून आपण काय बोलतो, याचेही भान त्यांना राहिलेले नाही.

त्यांच्या वक्तव्याची दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राज्यातही आघाडीमध्ये कॉँग्रेस पक्षाला निर्णय प्रक्रियेत कुठेही स्थान दिले जात नाही.

त्यामुळेच नैराश्येच्या भावनेतून आपण काय बोलतो, याचेही भान त्यांना राहिलेले नाही, अशा शब्दात आमदार विखे यांनी मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe