Ahmednagar News :भाजपाचे केंद्रातील नेते अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महत्त्वपूर्ण अशा महसूल खात्याची जबाबदारी दिली आहे. जिल्ह्याला या आधीही हे खातं मिळालं होतं.
परंतु यापूर्वी हे खाते वेगळ्या पद्धतीने काम करत होते. आता मात्र हे खातं वाळूतस्करांसाठी नव्हे तर सर्वसामान्यांचे प्रश्न मार्ग लावण्यासाठी काम करणार असल्याचे सांगत महाविकास आघाडीवर खासदार डॉ. सुजय विखे यांनी अप्रत्यक्ष टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय वयोश्री योजनेतंर्गत नगर शहर व भिंगारमधील १२०८ लाभार्थ्यांना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याहस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान पदावर कार्यतर असलेल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच गोरगरीबांसाठी असा उपक्रम राबविला जात आहे. हे आपण दाखविलेल्या विश्वासाचे फळ आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ४० हजार वयोवृद्धांना साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. येत्या सहा महिन्यांत शासन आपल्या दारी या उपक्रमातंर्गत शासकीय प्रतिनिधी प्रत्येकाच्या घरी येऊन वायस्कांचे डोल, रेशन कार्ड व इतर कामे करून देतील. यासाठी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही असेही खासदार विखे म्हणाले.