आता नगरचा रेल्वे प्रवास देखील होणार ‘सुपरफास्ट’ ; रेल्वेगाड्यांचा विनाकारण थांबा बंद होणार

Pragati
Published:

Ahmednagar News : मनमाड ते नगर डबल लाईन (द्रुतगती) रेल्वेमार्गाच्या नव्या टप्प्याची चाचणी नुकतीच घेण्यात आली. यात रेल्वेगाडीचा वेग वाढला आहे. या महत्त्वाकांक्षी कामामुळे नगरला फायदा होणार असून, नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होईल. अशी माहिती उप मुख्य अभियंता (बांधकाम) दीपक कुमार यांनी दिली.

मनमाड इलेक्ट्रीक डबल लाईन रेल्वे मार्ग प्रकल्पा अंतर्गत पुणतांबा ते कान्हेगाव ८.६६ कि.मी. अंतराची नवव्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाली. लवकरच नगर ते मनमाड पर्यंतचे हे काम पूर्ण होणार असून, यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पूर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजीनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षापासुन नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे.

या पुर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा, बेलापूर ते पढेगाव, निंबळक ते वांबोरी या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. आता नुकतेच पुणतांबा ते कान्हेगाव ८.६६ कि.मी. डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता एकूण ११५ कि.मी अंतराची चाचणी पूर्ण झाली आहे.

मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्त्व पूर्ण टप्पा येतो. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता. तसेच सिंगल लाईनमुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. तासनतास रेल्वे गाडी एकाच जागेवर थांबून ठेवावी लागत होती. मात्र आता हा पूर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजीनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाड्यांचा थांबा आता बंद होणार आहे.

पुणतांबा ते कान्हेगाव या द्रुतगती रेल्वे मार्गावर मध्ये गोदावरी नदीवरील लांबी २८८ मीटर व उंची १८ मीटर लांबीचा असलेला सर्वात मोठा पुल बांधण्यात आला आहे. हा रेल्वे पुल बनवण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला असून, नगर ते मनमाड रेल्वे द्रुतगती मार्गामधील सर्वात मोठ्या लांबीचा व उंचीचा पूल असून या पुलामुळे नगर-मनमाड रेल्वे गाड्या धावण्यासाठी बळकटी मिळाली आहे.

तसेच या कामामुळे रेल्वे ताशी १३० प्रति किमी वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही सुपरफास्ट होणार आहे. तीन वर्षापासून हे काम सुरू आहे. पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड व दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पूर्ण होणार आहे.

या चाचणीत या दुतगती मार्गाचा नेमका वेग काढण्यात आला. यावेळी ताशी १३० कि.मी. वेगाने रेल्वे धावली. नगर ते मनमाड पर्यंतचा टप्पा पुर्ण होण्यास अजून एक वर्ष लागतील असा अंदाज आहे. यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी ए.के. पांडे, मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे, उप मुख्य अभियंता दीपक कुमार, कार्यकारी अभियंता डी.पी. पटेल, कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा, सहाय्यक कार्यकारी अभियंता आर. जे. गायकवाड, सिनियर सेक्शन इंजिनिअर प्रगती पटेल, सेक्शन इजिनिअर धर्मेंद्र कुमार, सुद्धाशु कुमार, एक्झिकेटीव्ह, इंजिनिअर व रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe