अहमदनगर ब्रेकिंग : आता ही व्यक्ती होवु शकते नगरचे पालकमंत्री ! राष्ट्रवादीकडुन आले नवे नाव…

Published on -

AhmednagarLive24 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर व सोलापूर येथील पालकमंत्र्यांच्यासंबंधी वाद निर्माण झाला आहे. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना काही मंडळींकडून विरोध आहे, शिवाय ते स्वत:ही येथे काम करण्यास इच्छूक नाही.

तर सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासंबंधी तेथे उजणीच्या पाण्यावरून वाद उफाळला आहे. त्यांनाही बदलण्याची मागणी त्या जिल्ह्यात होत आहे.यामध्ये आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी लक्ष घातले असून या दोघांची आपसांत बदली करण्याचा निर्णय त्यांच्याकडून घेतला जाऊ शकतो,

असे पक्षातील मंडळींकडून सांगण्यात येऊ लागले आहे. तसे झाले तर भरणे हे अहमदनगरचे पालकमंत्री होऊ शकतात. २५ मे पर्यंत यासंबंधी निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे. खुद्द पवार यांनीच सोलापूरमध्ये बोलताना याचे संकेत दिल्याचे सांगण्यात येते

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe