अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- जिल्हा उद्योग केंद्र महामंडळाच्या कर्ज प्रकरण व सबसिडीत काही बँकेचे मॅनेजर अडवणूक करीत असल्याचा आरोप करुन लाभार्थींना त्यांचे कर्ज व सबसिडी मिळावी व संबंधीत बँक मॅनेजरवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले.
या उपोषणात छावा क्रांतीवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, दिपक चव्हाण, विशाल काळे, बबन वाघुले, प्रतिक मानकर, अशोक झरेकर, अरुण आढाव, रावसाहेब झरेकर, विजय पाटोळे, महादेव कांबळे आदि लाभार्थी सहभागी झाले होते. जिल्हा उद्योग केंद्र महामंडळाच्या कर्ज प्रकरणात बहुतेक बँका लाभार्थींना वर्षानुवर्ष त्रास देण्याचे काम करीत आहे.
संपुर्ण कार्य प्रणालीमध्ये पारदर्शक कामे होत नाही. मात्र लाभार्थ्यांची अडवणूक केली जात आहे. लाभार्थी जवळचे पैसे खर्च करून उद्योगवाढीसाठी खर्च करतात. यात बँक मॅनेजर आडकाठी उभी करीत असून, याचा फटका बेरोजगार, शेतकरी कामगार यांना बसत असल्याचा आरोप छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
प्रकरण मंजूर होण्यासह सबसिडी मिळण्यापर्यंत बँक मॅनेजर लाभार्थींना नाहक चकरा मारयला लावतात. यामध्ये इंडियन ओवरसीज बँक (शेंडी), महाराष्ट्र बँक (अकोळनेर) यांचा समावेश असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तरी लाभार्थींना त्रास देणार्या बँक मॅनेजरवर कारवाई करावी व लाभार्थींना त्यांची प्रकरणे मंजूर करुन दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved