Ahmednagar News : प्राचार्यांकडून मुलीबाबत आक्षेपार्ह पोस्ट, महिला प्राध्यापिकांनी दिलेत ‘हे’ जबाब ! शिक्षणक्षेत्रात खळबळ

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात ही घटना घडली आहे. एका प्राचार्याच्या मोबाइलवरून महाविद्यालयातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका विद्यार्थिनीबाबत आक्षेपार्ह मॅसेज पोस्ट करण्यात आले होते.

याबाबत महिला प्राध्यापिकांनीही जबाब दिला आहे. अधिक माहिती अशी : पारनेर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी सदर महाविद्यालयात चौकशी केली असता ‘विशाखा’ समितीतील प्राध्यापिकेने प्राचार्यांच्या मोबाइलवरून विद्यार्थी व प्राध्यापकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एका विद्यार्थिनीबद्दल आक्षेपार्ह मेसेज पोस्ट झाले होते असे मान्य केले आहे.

परंतु तिने असेही म्हटले आहे की, हे मेसेज पडले तेव्हा प्राचार्यांचा फोन त्यांच्या केबिनमध्ये होता व ते मुलांसोबत बाहेर उद्यानात होते. त्यामुळे त्यांच्या मोबाईलचा गैर वापर झालाय का? असा प्रश्न आता पडला आहे. दरम्यान त्या प्राध्यापिकेने पोलिसांना दिलेल्या या माहितीवरून प्राचार्याच्या मोबाइलवरूनच आक्षेपार्ह मेसेजेस पोस्ट झालेत हे नक्की झाले आहे.

परंतु प्राचार्याऐवजी अन्य कुणीतरी त्यांच्या मोबाइलचा गैरवापर केला असावा, असे प्राध्यापिकेच्या जबाबातून सध्या कळत आहे. परंतु एक प्रश्न असा पडला आहे की, प्राचार्य स्वतः ‘विशाखा’ समितीचे पदसिद्ध प्रमुख आहेत व त्यांनी त्यांच्या मोबाइलचा गैरवापर झाला असेल तर पोलिसात तक्रार का केली नाही? दरम्यान या प्रकरणी आता सीसीटीव्ही फुटेज व कॉल डिटेल्समधून काही माहिती तपासात समोर येऊ शकते असे म्हटले जात आहे.

आपल्या मोबाइलचा गैरवापर झाला

दरम्यान ज्यावेळी प्राचार्याच्या मोबाइलवरून मेसेजेस पोस्ट झाले त्यानंतर पुढे प्राचार्याच्याच मोबाइलवरून अशी पोस्ट टाकली गेली की ‘मी टाकलेले मेसेज डिलीट करावेत. चुकीने हा मेसेज पाठविला गेला. हे मेसेज त्या मुलीविषयी नाहीत.’ असं त्यात म्हटले होते अशीही माहिती समजली आहे.

 पोलीस करत आहेत तपास

या घटनेचा अधिक तपास आता पारनेर पोलीस करत आहेत. या तपासात आणखी काही सत्य समोर येऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe