Ahmednagar News : जामखेड सहा परिसरात सध्या सुरु असलेल्या अवकाळी पावसाने तालुक्यातील पिंपळगाव उंडा व वाघासह परिसरातील शेतकऱ्यांच्या रब्बी पीक, ज्वारी कांदा व तुरीचे नुकसान झाले आहे.
मात्र शासनाने जाहीर केलेल्या नुकसान अनुदान देणे कामी पंचनाम्यासाठी पाठवलेले अधिकारी योग्य त्या पद्धतीने पंचनामे करत नसुन टाळाटाळ करत असल्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढुन संताप व्यक्त केला.
जर पंचनामे व्यवस्थित केले नाहीत तर काही दिवसात संबंधित पंचनामे करणाऱ्या अधिकाऱ्यांना काळे फासण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेश आजबे यांनी दिला.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या रब्बी पीक, ज्वारी कांदा व तुर यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र अधिकारी पंचनामे करण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. याच अनुषंगाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष मंगेश आजबे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन दिले.
या निवेदनात नमूद केले आहे की, अवकाळी पावसामुळे आमच्या सर्व शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे भुईसपाट झालेले आहे. सर्व शेतकरी शेतीवर अवलंबुन असुन शासनाने जाहीर गेलेल्या नुकसान अनुदान देणे कामी
शासनाने पंचनाम्यासाठी पाठविलेले अधिकारी योग्य त्या पद्धतीने पंचनामा करीत नाही मनमानी कारभार करतात नुकसान झालेले क्षेत्र व्यवस्थित लिहीत नाहीत. त्यामुळे आमच्या कुटुंबाची उपासमार होण्याची शक्यता असून शासनाच्या अनुदानापासून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.