अरे बापरे! शिक्षकाने गळफास घेऊन केली आत्महत्या ‘या’ तालुक्यातील घटना

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- एका शिक्षकाने अकोले तालुक्यातील विठा घाटातील जंगलात लिंबाच्या झाडाला स्वतः च्या अंगातील शर्ट काढून त्याचाच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.विठ्ठल सुभाष सानप (वय ४१)असे त्या मृत शिक्षकाचे नाव असून सिन्नर तालुक्यातील गुळवंच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते अध्यपन करत होते.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिन्नर तालुक्यातील गुळवंच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विठ्ठल सुभाष सानप यांची सिन्नर पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल होती.

दरम्यान अकोले तालुक्यातील राजुर जवळ असलेल्या विठे घाटातील रस्त्यावर आपली मोटारसायकल लावली. जवळील जंगलात जाऊन आपला शर्ट काढुन त्याचा गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजले नाही. याबाबत राजुर पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe