अरे बापरे! या ठिकाणी मृत माशांचा अक्षरशः झाला आहे ‘खच’

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2021 :- प्रवरा नदीवरील लाख बंधाऱ्यात अज्ञात ठिकाणाहून विषारी, प्रदूषित पाणी वाहून आल्यामुळे बंधाऱ्यातील पाणी दूषित झाले आहे.

त्यामुळे लाखो मासे मृत झाले असून त्यांचा अक्षरश: खच पडला आहे. परिसरातील पाण्याचे उद्भव धोक्यात आल्याने या पाण्याचा उद्भव शोधून तो बंद करावा व संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

प्रवरा नदीवर असलेला हा लाख बंधारा इंग्रजांनी बांधलेला आहे. या बंधाऱ्याच्या पाण्यावर परिसरातील अनेक गावांची शेती अवलंबून आहे; परंतु गेल्या काही दिवसांपासून अज्ञात ठिकाणाहून या बंधाऱ्यात घाण व दूषित पाणी जमा होत आहे.

त्यामुळे संपूर्ण बंधाऱ्यातील पाणी दूषित झाले आहे. या बंधाऱ्यातून एक कॅनॉलही काढण्यात आला आहे. या कॅनॉलमधून परिसरातील गावांच्या शेतीसाठी पाणी जाते.

आता या पाण्यामुळे पिके धोक्यात आली असून शेतीला दिलेले हे विषारी पाणी जमिनीत जिरणार आहे. त्यामुळे परिसरातील भूजलही दूषित होणार आहे. त्यामुळे पाण्याचे उद्भवही धोक्यात येणार आहेत.

राहुरी तालुक्यातील लाख, जातप, त्रिंबकपूर येथील अनेक पाण्याचे उद्भव धोक्यात आलेले आहेत. विहिरी व बोअरचे पाणी खराब होणार आहे.

त्यामुळे वापरासाठी दूषित पाणी वापरावे लागेल. परिणामी जनावरांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.तरी याबाबत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!