अरे बापरे! ‘या’ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनाच तरुणांची शिवीगाळ व धक्काबुक्की

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्बंध घातले आहेत. तसेच त्यांचे पालन करण्यासाठी संबंधितअधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.(Ahmednagar Crime)

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी आदेश व कोरोना सुसंगत वर्तन नियमांची अंमलबजावणी करत असताना गर्दी करू नका येथून निघून जा,

असे म्हटल्याचा राग आल्याने तरुणांनी राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी राहाता पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राज्यात कोरोना विषाणूचा ओमायक्रॉनचा प्रसार वाढत असून

त्या अनुषंगाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे पालन व्हावे, यासाठी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास राहाता नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांसोबत शहरात गस्त घालत असताना

राहाता ग्रामीण रुग्णालयाच्या शेजारी असलेल्या हर्षल मेन्स पार्लर येथे गर्दी दिसल्याने मी राहाता नगर परिषदेचा मुख्याधिकारी आहे, असे सांगून इथे गर्दी करू नका तसेच सदरचे दुकान बंद करण्यास सांगितले असता

सदर व्यक्तींना माझ्या सांगण्याचा राग आला. त्यानंतर त्यांनी आम्ही इथून जाणार नाही तुला काय करायचे ते कर, असे सांगत पोपट रघुनाथ जाधव, निसार सय्यद ऊर्फ राज्जु भाई, सिद्धार्थ वाघमारे यांनी गोंधळ घालून मला धक्काबुक्की केली.

अशी फिर्याद दिली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी येत असल्याचे समजताच हे सर्व पळून गेले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe