अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- तू गवत दुसऱ्याला का विकले असे म्हणत चुलत भावानेच डोक्यात कुऱ्हाड मारून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे घडली.
या रावसाहेब पंढरीनाथ कानवडे (रा. लिंगदेव ता. अकोले) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लोणी येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी अण्णासाहेब गोविंद कानवडे याला येथील शेत वस्तीवरून अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, रावसाहेब पंढरीनाथ कानवडे यांच्या जवळच त्यांचे चुलत भाऊ अण्णासाहेब गोविंद कानवडे राहतात त्यांच्यात रस्त्याच्या कारणावरून नेहमी वाद होत असत
अण्णासाहेब हा नेहमी त्यांना शिवीगाळ दमदाटी करून जीवे ठार मारण्याची धमकी द्यायचा रावसाहेब कानडे हे त्यांच्या घरासमोर उभे होते तेव्हा अण्णासाहेब कानवडे हा त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला की तु माझ्याकडे रागाने का पाहत आहे
तू गवत दुसऱ्याला का विकली ते आता मी माझ्या रस्त्याने दुसऱ्याला घेऊन जाऊ देणार नाही असे म्हणून शिवीगाळ व दमदाटी केली त्या समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता
तो अंगावर धावून आला आणि त्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली रावसाहेब यांनी त्यास प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता अण्णासाहेब यांनी त्यांच्या हातातील कुऱ्हाड रावसाहेब यांच्या डोक्यात मारली.
डोक्यात घाव बसल्याने तो मोठ्याने ओरडला, त्यामुळे आजूबाजूचे काही लोक जमा झाले. यावेळी रावसाहेब यांची आई सासू बाई आणि मुलगा यांना देखील अण्णासाहेब आणि त्यांच्या पत्नी मारहाण केली.
मात्र त्यांना जास्त मार लागल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. अण्णासाहेब तुम्ही जर गुन्हा दाखल केला तर मी नंतर तुम्हा सर्वांना फार मारून टाकीन अशा प्रकारची धमकी दिली .
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम